Through his sacred writings and discourses, His Holiness Paramatmaraj Maharaj continues to guide devotees on the path of truth and spirituality. His monumental work, Paramabdhi — written in Sanskrit and later translated by him into Marathi and Hindi — stands as a complete source of divine knowledge, blessed by Lord Dattatreya Himself.
Along with this, Maharaj has authored booklets such as Swanubhava, where he shares his personal spiritual experiences, and Cheyan, which presents 108 insights into the essence of Paramabdhi. These works are not just books but living companions on the spiritual journey.
To reach devotees across all walks of life, Maharaj’s teachings are also shared through videos — making his wisdom accessible in every home. Each word, whether read or heard, carries the power to transform lives with devotion, clarity, and inner strength.
Paramabdhi is a book which is accepted by the dignitaries related with various religions, castes and creeds.This book states the importance of universal religion.This book contains an extract of whole religious world and philosophical world.This book is highly praised by several major authorities in religious field and other fields.Their opinions are printed in Bhavik Bhavana Periodical published from 2005 to 2015.
The supreme book Paramabdhi is regarded as supreme wealth for whole universe. This purest book is esteemed by the dignitaries related to various religions, sects and creeds.
The sacred book ‘Satposh’ gives an emphasis on the description of Atman (soul),mind and related subjects.This book gives huge knowledge about various thoughts and their power.There are several subjects in this book which are important in day to day life of every person. This book nourishes all good things which are useful for all human beings.
The book Mahonnay is for the elimination of wrong emotions from mind.Hence this book is being very very helpful for the persons who want to purify their mind and want to succeed in the field of spiritualism and other fields also.This book is essential for removal of harmful thoughts. The great uplift can be achieved by removing wrong concepts from mind. Hence the book Mahonnay is very very important for an essential uplift of every person.
Vartet is a book which is very very useful for understanding universal spiritualism . This book gives tremendons knowledge about the various aspects of spiritualism.This book also contains the knowledge about the sacred forms like Brahmadev,Vishnu,Shiv, GuruDattatreya and other holy forms. The book also tells much more information about various goddesses.
This book has described various holy places related to various sects. In this book Vartet, many useful theorems about spiritualism are given in detailed form.
The book Rasyav is very important book in the field of universal spiritualism. This book will be very very useful for the persons who want to get success in spiritual journey. This book also will play a major role for eliminating wrong thoughts from mind. Hence this book is important for getting help from it in life. The book will be loved by the persons in all castes ,sects and religions.The book Rasyav will give pleasure to all.In this book , there are examples from the history of various religions, sects etc.
This book is a very strong guide to eliminate the various mental diseases from the world. This book covers various philosophical topics which must be learned by the interested persons.
In the book Tanwas, there is much more description about many secrets in the field of worldwide spiritualism. There are several hints to avoid problems and to remove problems in life. Spiritualistic knowledge is given in this book by giving examples in various fields of knowledge. Various persons in the field of medical science, engineering, physics, chemistry, biology, economics, sociology, political science, commerce, linguistics, agriculture etc shall have interest in this book. This book Tanwas is very very useful for every person. By materialistic point of view and by spiritualistic point of view also the book will be much more useful for the readers.
The book “Shiprot” is useful in spiritual life and in materialistic life also. In this book there are several examples which guide the man in life. In the book Shiprot, there are several subjects which are important for whole human race. There are laws for the life journey and remedies for overcoming the obstacles. The book contains the holy instruments for making the life pious and auspicious. The readers can understand the various forms of the life strength. The various short stories in the book possess the power of useful change in the life of human being. The book “Shiprot”also is useful for the persons belonging to all castes, sects and religions. The book gives the knowledge about the various forms of protections, various forms of education and many other topics. In the book Shiprot, there is much more information about the establishment of good feelings in mind and the establishment of peace in the mind. Everyone should read the book “Shiprot”.
In the book ‘Sidhren’, there is full description about Covid-19 epidemic.This book has given much more information about corona virus and other viruses also. This book gives an emphasis on the precautions to avoid the Covid-19 disease and other diseases also. The book ‘Sidhren’ also describes various theorems in spiritualism.
There are 51 yogas in the book “Sidhren”. All the yogas are essential in human life. Hence this book also can be read at any time.
Cheyan is a book expressing an importance of the ‘Paramabdhi’ for the people of every caste,creed and religion. In this book there are various points which depict the necessity of the book Paramabdhi through various angles.This booklet Cheyan creates an affection about universal religion established by the book Paramabdhi.
108 points mentioned in Cheyan are very very helpful to every person for increasing the pure love in his mind about the universal religion.
23 July 2025
This Guru Purnima (23 Jul), earn Datta Prbhu’s grace for you and your family’s physical and spiritual wellbeing through online offerings.
21 June 2025
This Guru Purnima (23 Jul), earn Datta Prbhu’s grace for you and your family’s physical and spiritual wellbeing through online offerings.
Join our Annual Book Subscription and receive the divine writings and teachings of His Holiness Paramatmaraj Maharaj delivered to you. Each book carries timeless knowledge, spiritual guidance, and blessings that enlighten your path throughout the year.
23 August 2025
“कुठल्याही जातीतील माणसांनी जातीच्या अन्तर्गत एकमेकांशी व अन्य जातीच्या लोकांशी विद्रोह करू नये. माणसांनी माणसांशी विद्रोह करण्याची किंचितही गरज नाही. अनिष्ट रूढी किंवा जे काही अनिष्ट विचार असतील त्या सगळ्या अनिष्ट बाबींशी विद्रोह करण्याची गरज असते, हे समजून घ्यावे.”
“जीवनावश्यक वस्तूंचा बोझाही कधीतरी मनुष्याला रडवू शकतो. परन्तु मनुष्याने केलेल्या पापांचा बोझा त्याला किती प्रदीर्घकाळ रडवत राहील, याची कल्पनाच केलेली बरी.”
” परमार्थमार्गाने चालतांना धर्ममूल्यांची हेळसांड करून चालत नाही. धर्म हा पुरुषार्थच अन्य तीन पुरुषार्थांचा आधार असतो. म्हणूनच पापाचरण न करता अध्यात्ममार्गक्रमण होत राहणे महत्त्वाचे आहे.”
“व्यावहारिक जीवनात यश मिळविण्यासाठी ज्याप्रमाणे सद्गुणांची आवश्यकता आहे त्याचप्रमाणे आध्यात्मिक क्षेत्रातील यशासाठीही आहे. त्यामुळे सर्व साधकांनी आपल्या अन्तःकरणामध्ये सद्गुण बीजारोपण होऊ देणे गरजेचे असते.”
“धर्मविशेष, जाती किंवा सम्प्रदायाच्या नांवावर जाळपोळ, हिंसाचार इत्यादींद्वारे दंगा माजविण्यापेक्षा स्वतःच्या अन्तःकरणातील घाण कचऱ्याला जाळून उद्धम बनण्याचा प्रयत्न करणे चांगले.”
“साधकाने आपले मन नेहमी निष्पाप ठेवण्याचा प्रयत्न केल्यास आत्मलाभाचा परमपवित्र क्षण जीवनात लवकर येऊ शकतो.”
“कोठल्याही जातिजमातींमध्ये जन्माला आलेले साधक असोत, त्यांच्यामध्ये अतूट श्रद्धा, अतूट भक्ती असल्यास ते आपल्या जीवनातील अध्यात्मयात्रा पूर्णत्वाकडे नेऊ शकतात.”
“आत्मीयता’ रूपिणी भावनेचे संशुध्दीकरण व संवर्धन हे पारमार्थिक मार्गक्रमणात आवश्यक असते. सद्गुरू, साधना, साध्य इ. विषयी आत्यंतिक आत्मीयतेची भावना ही आत्यंतिक कल्याणकारिणी असते.”
“आध्यात्मिक क्षेत्रात विनम्र होणे म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या जय प्राप्त करणे. तो जय पूर्णमंगलरूपच असतो. सद्गुरुमुखातून प्रकट झालेल्या ज्ञानामुळे मंगल होते, महावाक्याचे तात्पर्य कळल्याने धन्यत्वाचा लाभहोतो.”
“ नित्य मांगल्याची इच्छा असणाऱ्या सर्व लोकांनी शुद्धान्न सेवनाद्वारे व ज्ञानप्रसाद सेवनाद्वारे सन्तृप्त व्हावे.”
” प्राणज्योती, ज्ञानज्योती व सर्वाधिष्ठानरूप निजात्मतत्त्व परमज्योतीचे दीप हा प्रतीक आहे. दीप्तिमय परमार्थमार्गाकडे लक्ष वेधण्याकरिता, दिव्यप्रकाशयुक्त ऊर्ध्वलोकाच्या संधानाकरिता किंवा सामूहिक समाधानाचे एक साधन म्हणून दीपोत्सवाचे एक विशिष्ट स्थान आहे. दीपोत्सव हा प्रकाशोत्सव आहे, शुभ्रोत्सव आहे, सात्विक प्रवृत्तींचा उत्सव आहे. शुक्लभाव वितरणोत्सव आहे.”
“ऋषी, मुनी, अवतार, प्रेषित, सिद्ध, बुद्ध, तीर्थंकर, प्राफेट, पैगम्बर, सन्त इत्यादी नांवांनी ओळखल्या जाणाऱ्यांपैकी कोणत्याही महात्म्याची निंदा केली जाऊ नये. सर्व जातिधर्मपंथांशी संबंधित असलेले सगळे महात्मे पवित्र आहेत, हे सर्वांनी पुन्हा पुन्हा समजून घेणे गरजेचे आहे.”
“ मनुष्यांनी दैवी विचारांचा आदर्श पुढे ठेवावा. राक्षसी विचारांचा आदर्श स्वीकारू नये. देवसमूहाला न मानता असुरसमूहाची बाजू घेणारे लोक असुरत्वाकडे जाऊन आध्यात्मिक दृष्ट्या भ्रष्ट/ नष्ट होऊन जात असतात. त्यामुळे मानवांनी तसे करू नये.”
“प्रगत विज्ञानामुळे इण्टरनेटचा विकास झाला आहे. त्याचा चांगला उपयोग करून घेण्याचे स्वातंत्र्य आहे. परन्तु कोणीही त्या इण्टरनेटचा दुरुपयोग करू नये. देवीदेवता, ऋषी, मुनी, अवतार, प्रेषित, संत इत्यादी नांवांनी ओळखल्या जाणाऱ्या विभूतींचा अपमान केला जाऊ नये. संकुचित विचारांचा प्रसार करून पांथिक कलहवृद्धी करण्यासाठी इण्टरनेटचा वापर कोणीही करू नये.”
” भक्ती ही माणसाला विनम्र बनवित असते. चार चार तास ती आपल्या इष्टासाठी रडायलासुध्दा लावू शकते. म्हणजे ती माणसाला एकदम नम्र करत असते. विशुध्द भक्ती ही अनेक स्वरुपाच्या दुर्गुणांपासून माणसाचं संरक्षण करू शकते. म्हणून दुर्गुणांच्या नाशासाठी विशुध्द अशा भक्तिमार्गाचं एक अनन्यसाधारण महत्त्व असतेच असते.”
“जगभरात सध्या जातिधर्मसंप्रदायादिकांच्या नांवावर प्रचण्ड विद्वेष व हिंसाचार चालू आहे. ही अभद्रोत्पत्ती थांबावी व सर्वांनाच सर्वजनकल्याणकारक अशा वैश्विक धर्माचे रहस्य कळून यावे, यासाठी परमाब्धि ग्रंथाच्या सार्वत्रिक प्रसाराची नितांत आवश्यकता आहे. हे लक्षात घेऊन सर्व जातिधर्मसंप्रदायांमधील साधुसंत व इतरही भाविक लोक यासाठी प्रयत्नशील राहतील, ही शुभाभिलाषा.”
“पारमार्थिक साधनायात्रेमध्ये भावनेला अतिशय महत्त्व आहे. अनिष्ट भावना सोडून देऊन परमार्थमार्गाला पोषक असलेल्या इष्ट भावनांचे संरक्षण व संगोपन करणे गरजेचे असते.”
“जगामध्ये व्यावहारिकदृष्ट्या चांगल्याही बाबी आहेत, वाईटही बाबी आहेत. साधकांमध्ये जर द्वेष, मत्सर, असूया इत्यादी असतील तर त्या सगळ्या बाबी दूषणास्पद बाबी होत. दूषणास्पद बाबींना दूर करून अध्यात्मक्षेत्रात भूषणास्पद बाबींचा अंगीकार करण्याला अत्यन्त महत्त्व आहे.”
“ चांगल्या मार्गाने वाटचाल करीत राहिल्यास आध्यात्मिक साधना योग्यवेळी परिपक्व होऊन साधकाला आध्यात्मिक लाभ होतो. सगळ्यांनी आपल्या जीवनात आध्यात्मिक लाभ मिळविण्याचा प्रयत्न करावा.”
आध्यात्मिक क्षेत्रात विनम्र होणे म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या जय प्राप्त करणे. तो जय पूर्णमंगलरूपच असतो. सद्गुरुमुखातून प्रकट झालेल्या ज्ञानामुळे मंगल होते, महावाक्याचे तात्पर्य कळल्याने धन्यत्वाचा लाभ होतो.
“ मानव जन्म पुन्हा पुन्हा मिळेल याचा भरवसा नाही. म्हणून या मृत्युलोकी मानवदेहात असताना सर्व मुमुक्षूनी मोठी साधना करून आध्यात्मिक लाभوو प्राप्त करावा.”
” काही लोक क्षणभंगूर विषयांसाठी कुढत असतात, दुसऱ्यांची उन्नती बघून कुढत असतात. त्या कुढत बसण्याने त्यांचीच हानी होते. त्यांनीहि ते कुढणे सोडून देऊन स्वहितासाठी गूढज्ञानाचा आश्रय घ्यावा.”
” आपल्या जीवनमंदिरावर मोक्षरूपी कलश बसविणे म्हणजे आध्यात्मिक जीवनातील अत्युच्च साध्य प्राप्त करणे होय.”
“अध्यात्मशास्त्राच्या माध्यमातून ज्या शाश्वत हिताविषयी उपदेश करण्यात आलेला आहे ते शाश्वत हित साधकांनी मिळवावे. बाकीचे लाभ हे नश्वर आहेत. परन्तु आध्यात्मिक लाभ हा अनन्त काळासाठी आहे. म्हणून तो शाश्वत लाभ आहे.”
” जीवनाची क्षणभंगुरता लक्षात घेऊन मनुष्याने मिळालेल्या जीवनकालखण्डाचा सदुपयोग करून घेतला पाहिजे. अध्यात्मशास्त्र जाणून घेण्याचा प्रयत्न करावयास पाहिजे. “
” जगताला जीर्णकूपाची म्हणजेच जुनाट अशा नादुरुस्त रूपातील ओसाड विहिरीची उपमा देण्यात येत असते. प्रचण्डदुःखरूप जलचरांच्या भक्ष्यस्थानी पडण्याआधीच सद्गुरू या विहिरीतून जीवाची सुटका करतो.”
“जगताला अरण्याची उपमा देण्यात येत असते. भवारण्यात वाट चुकलेल्या, गुरफटलेल्या, अडकून बसलेल्या जीवाला योग्य मार्ग दाखवून त्या मार्गावर चालण्यासाठी सुयोग्य गती देण्याचे काम व अन्तिमतः शाश्वतसुखरूपिणी श्रेष्ठ गती देण्याचे काम सद्गुरू करतो.”
“परस्परसंघर्ष टाळण्यासाठी सर्व जातिधर्मपंथांशी संबंधित मनुष्यांनी सर्व जातिधर्मपथजनकल्याणकारक असा शाश्वतसिद्धान्तरत्नाकर स्वरूप परमाब्धि ग्रंथ वारंवार वाचावा. तसेच सत्पोष, महोन्नय, वर्तेट, रस्याव इत्यादी ग्रंथांचेही वारंवार वाचन करावे. यामुळे सर्व जातिधर्मपथमान्य अशा सत्यसिद्धान्तरूप सुदिव्य रत्नांचा लाभ वाचकांना होईल.”
“अन्तःकरणात विरक्त भावनेचा उदय झाल्यानंतर ती टिकून राहणे महत्वाचे असते. विरक्तीला टिकवून ठेवणे म्हणजेच विरक्तिसन्निताय. ज्ञान व विरक्ती टिकून राहिल्यास विमुक्तावस्थाही टिकून राहते. “
“ आध्यात्मिक मार्गाने चालतांनाही माणसाला उचितवर्तन कोणते, अनुचितवर्तन कोणते, हे समजायलाच पाहिजे. उचित क्रिया कोणत्या, अनुचित क्रिया कोणत्या हे जाणून घेऊन साधनोचित क्रियांनाच करण्याचे ठरविले पाहिजे. अध्यात्ममार्गाने चालताना भौतिकस्वार्थामुळे जर अनुचित वर्तन घडले तर मोठी हानी होण्याचा संभव असतो.”
” ज्याप्रमाणे साध्या झोपेतून जाग येण्यासाठी कॉर्टिसॉल नांवाचे सम्प्रेरक साहाय्यक ठरते त्याप्रमाणे प्रदीर्घ काळापासून असलेल्या अज्ञाननिद्रेतून जागे होण्यासाठी अध्यात्मवाक्यरूप सम्प्रेरक साहाय्यक ठरते.”
” मानवांनी त्यांच्यात जी काही दानवता असेल तिचा त्याग करून विशुद्ध मानवतेचा अंगीकार केल्यास ती एक महत्त्वपूर्ण उत्क्रान्तीच ठरते. मानवांनी दैवीगुणसंपत्तीचा स्वतःमध्ये अधिकाधिक विकास केल्यास ती विकासक्रिया सद्गुणवर्धनदृष्टिकोणातून उत्क्रान्तीच ठरते.”
“जगात शिक्षित असुरांची निर्मिती होऊ नये, शिक्षित मानवांची निर्मिती होत राहावी यासाठी सुयोग्य पद्धतीच्या अर्भशिक्षणादी शिक्षण प्रकारांची आवश्यकता आहे.”
” चोरीने मिळविलेले धन आयुष्यभर पुरेल असे नाही. विद्याधन हे अत्यन्त महत्त्वाचे आहे. ते कोणी चोरू शकत नाही. म्हणून भौतिकधनापेक्षाही ते अधिक महत्त्वपूर्ण आहे.”
“जगात विविध जातिधर्मपंथांमधील पुष्कळशे लोक केवळ आपण धार्मिक असल्याचा आभास निर्माण करतात. मनःशुद्धी नसल्याने धर्ममूल्यांचे रहस्य व्यवस्थित समजून घेत नाहीत. त्यामुळे धर्माच्या नांवावर अधर्म करतात.”
“विविध जातिधर्मपंथांमधील संकीर्णत्वासक्त वेड्यांचा आजार दूर करण्यासाठी व विविध जातिधर्मपंथांमधील समजूतदार लोकांना त्यांच्या समजूतदारपणाचा योग्य उपयोग करून घेता यावा म्हणून परमाब्धि ग्रंथ आहे. या ग्रंथात समन्वयसूत्रांद्वारे सर्व वर्गांना एकत्र ओवण्यात आलेले आहे.”
” धैर्यसंगोपन करून पारमार्थिक साधना करीत राहिल्यास जगद्रूप चिखलातही ज्ञानकमळाचा लाभ होऊ शकतो, हे सर्वांनी लक्षात ठेवावे.”
“जगातील वेद, बायबल, कुराण इत्यादी सर्वधर्मग्रंथांचे विशुद्ध सार ‘परमाब्धि’ ग्रंथात आहे. तसेच सम्पूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी जे जे आवश्यक आहे ते या ग्रंथात आहे. सर्व पूर्वग्रंथांच्या सुदिव्य इच्छांची परिपूर्ती परमाब्धि ग्रंथात आहे.”
” परमाब्धिमध्ये असलेल्या संसूत्रणाचा स्वीकार केल्यास विविध वर्गामधील लोकांमध्ये परस्परसौहार्द वाढून शान्ती नान्देल. सगळ्या धर्मग्रंथांचा निःसंशय व परिपूर्ण असा सार समजून घेणे हे सर्व मानवहितासाठी आवश्यक आहे. त्यासाठीच परमाब्धिमध्ये संसूत्रण आहे.”
“इथे पौर्णिमा उत्सव, श्रीदत्तजयंती उत्सव तसेच इतरही जे काही कार्यक्रम चालू असतात त्यासाठी सर्व भाविकांनी येत राहावे. अवश्य अवश्य येत राहा. सर्व लोकांचे हित व्हावे, या इच्छेमुळे सर्वांना निश्चितच आमंत्रित करीत असतो. लोकांनी प्रेमभाव ठेवून सुदिव्य आमन्त्रणाचा स्वीकार करावा.”
“जगात जेवढे काही धर्मविशेष आहेत, सम्प्रदाय आहेत त्या सगळ्यांना स्वतःमध्ये सामावून घेणारा ग्रंथ म्हणजे परमाब्धिः. धार्मिक क्षेत्रातील व इतरही क्षेत्रांमधील सर्व वर्गामधील लोकांना मान्य होणारे विचार परमाब्धिमध्ये आहेत.”
” जगात काही व्यक्ती इतरांवर भौतिकदृष्ट्या प्रभाव पडेल अशाच विचारांमध्ये गढून गेलेली असतात. असे करण्यापेक्षा आध्यात्मिक विचारांचे आपल्या चित्तावर इम्प्रेशन पडू देण्याचे जास्त महत्त्व आहे. भौतिक उन्नतीच्या आकाशामध्ये उडण्यापेक्षाही मोक्षाकाशात उडण्यासाठीचा प्रयत्न करणे जास्त महत्त्वाचे आहे. त्यासाठी अध्यात्मज्ञानरूप साधनाचा वापर करायलाच पाहिजे.”
“सोनं हरवलं तर पुन्हा ते बाजारात मिळू शकते. परन्तु भक्तिभाव हरवला तर पुन्हा तो बाजारात विकत मिळत नाही. सन्निष्ठा सम्पली तर ती निष्ठा बाजारात जाऊन विकत घेता येत नाही. अन्तःकरणात उत्पन्न झालेल्या उचित निष्ठेचे संरक्षण करावे लागते. अन्तःकरणात निर्माण झालेल्या भक्तिभावाला टिकवून ठेवावे लागते.”
“सत्तेच्या नशेमध्ये घेतला जाणारा आनन्द हा सत्ता गेली की सम्पून जातो. धनाच्या नशेने आलेला आनन्द धन संपले की सम्पून जातो. इतरही भौतिकमदातून उद्भवलेला आनंदही एके दिवशी सम्पून जातो. भौतिक बाबीतून उद्भवणारे आनन्द हे शाश्वत नाहीत. आत्मस्वरूपाचा आनन्द हाच शाश्वत असल्यामुळे सर्वश्रेष्ठ आनन्द आहे.”
” ज्या माणसांना आपल्या मनातील उचित भावना कोणत्या, अनुचित कोणत्या हेच समजत नाही म्हणजेच ज्या माणसांमध्ये भावशीलनाचे बळ नसते ती माणसं आध्यात्मिक क्षेत्रात उन्नती करू शकत नाहीत. जी माणसं त्यांच्या मनात अनुचित भावना टिकवून ठेवण्याचं ठरवीत असतात त्यांच्यासाठी आध्यात्मिक उन्नतीचे मार्ग संपलेले असतात.”
” अज्ञानाने जखडलेला कोणताही (बद्ध) जीव हा सद्गुरुकृपेने उचित साधना करून मुक्त होऊ शकतो. जीवनात कोठलीही परिस्थिती असो प्रत्येकाने आयुष्य असेपर्यन्त आपल्या देहाचा उपयोग करून घ्यायलाच पाहिजे.”
“ज्ञान हे सद्गुरूंच्या चरणांचाच आश्रय घेत असते. सद्गुरूकृपेशिवाय ज्ञान टिकू शकत नाही, ज्ञानाधारित धर्ममूल्ये टिकू शकत नाहीत.”
” पुष्कळशी जी माणसे सुधरू शकतात त्यांच्या अन्तःकरणातील अंधार दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. परन्तु काही लोकांची धर्माध, जात्यन्ध किंवा सम्प्रदायांध अवस्थेत कायमपणे टिकून राहण्याची तीव्र इच्छा असते. त्यांच्या अन्तःकरणातील जागतिक अशान्तिवर्धक अंधार संपूच नये अशी त्यांची ठाम इच्छा असते. अशा विचित्र लोकांना काही काळापुरते टाळले तरी चालते. परन्तु जी माणसे सुधरू शकतात त्यांना सुधरवण्यासाठी उज्जोतनाची आवश्यकता आहेच.”
” कुठल्याही जन्मातील कर्म हे केव्हातरी फळ देतच असते. शाश्वत सत्तेच्या माध्यमातून कुणावरही अन्याय केला जात नाही. ज्याच्या त्याच्या कर्मांच्या अनुसार फळ दिले जात असते. “
“विविध परम्परामधील लोकांनी एकमेकांशी वैमनस्य करून वितण्डादिकांमध्ये जीवनाचा बहुमूल्य काळ खर्च करण्यापेक्षा परस्परसौहार्दवर्धन करणारे विविध मुद्दे समजून घ्यावेत आणि जीवनाचा मुख्यत्वे पारमार्थिक साफल्यासाठी उपयोग करून घ्यावा.”
“जगात पुष्कळशी माणसे असे समजत राहतात की ‘सांसारिक कामेच आपल्या आयुष्यरूप बरणीत ठासून भरली आहेत. त्यात अन्य काही भरलेच जाऊ शकत नाही’. परन्तु आयुष्यरूप बरणीत जीवननिर्वाहकारी कार्यासोबतच पुण्यकार्य व पारमार्थिक साधनारूप जीवन (पाणी) मावू शकतेच, हे लक्षात असू द्यावे.”
“जगात भरपूर भाषा आहेत. विविध भाषांमध्ये लोक विश्वासाकरिता आपल्या मुखातून वेगवेगळे शब्द उपयोगात आणत असले तरी सर्व मानवांच्या अन्तःकरणात सर्वजनकल्याणकारक अशा परमधर्माविषयी परमविश्वास असणे अत्यावश्यक आहे. सर्वजातिधर्मपंथांच्या लोकांसाठी अनादिकाळापासून अनंतकाळापर्यन्त एकच परमसमुद्ररूप सद्धर्म आहे, हे सर्वांनी जाणून घ्यावे.”
“काही लोक सध्या वाईट वागत असले तरी मागील जन्माचे त्यांचे काही पुण्य असल्यामुळे त्यांची भौतिक उन्नती झालेली आढळते. परन्तु त्यांच्या पापाचा घडा भरल्यावर त्यांची मोठी अधोगती होऊन जाते. तसे लोक शेवटी पापाच्या खड्ड्यात संपून जात असतात.”
“वृक्षाची छाया ज्याप्रमाणे शीतलता प्रदान करते त्याचप्रमाणे संसारतापाने पोळलेल्या जीवाला सुदिव्यकृपारूपिणी छाया शीतलता प्रदान करते”. यासारख्या विविध मुद्यांचे चिन्तन करूनही कित्येक जण परमार्थमार्गाकडे वळतात.”
“पोत्याचं गोंगतं हे पावसापासून डोक्याचं संरक्षण करते. त्याचप्रमाणे गुरुकृपारूपी गोंगतं हे संकटांच्या अतिवृष्टीतही साधकाच्या डोक्यातील चांगल्या विचारांचं संरक्षण करते. म्हणून गुरुकृपा सांभाळून ठेवणारी गोणी हवी. विकारांची गोणी नको.”
” पीकांच्या सुयोग्य वाढीसाठी सुयोग्य मात्रेत काही द्रव्यांची आवश्यकता असते त्याचप्रमाणे आध्यात्मिक मार्गाने प्रगती होण्यासाठी अध्यात्मप्रीतिवर्धक गुणांची आवश्यकता असते. मनाला जर अनिष्टभावरूप कीटकांचा त्रास होत असला तर त्यांचाही विनाश आवश्यक असतो.”
“माणसामाणसांमधील युद्ध हे कधीतरी जगद्विनाशकारीरूप धारण करू शकत असते. माणसांना युद्ध करायचे असल्यास त्यांनी आपल्या अन्तरंगातील षड्रिपूंशी करावे व त्या दृष्टीने समरानन्द बनावे. माणसांनी आध्यात्मिकदृष्ट्या समरानंद बनावे, भौतिकयुद्धानंदाची अपेक्षा करू नये.”
“विश्वामध्ये जे काही ज्ञान आहे ते ज्ञान समजून घेणे अत्यावश्यक आहे. फक्त माझा पंथ असा वाढला, तेवढा वाढला इ. बाकीच्या गोष्टींमध्ये काहीही मर्म नाही. आणि म्हणून यासाठी योग्य वाचन होणे आवश्यक आहे. त्यावेळेस खरं योग्य काय आहे ते समजेल. अयोग्याला लोक दूर फेकून देतील. म्हणून योग्याकडे वाटचाल होणे आवश्यक आहे. त्याकरिता योग्य वाचनाची आवश्यकता आहे.”
“जे उत्तम बोधाचं वारंवार वाचन करीत असतात आणि त्या रीतीने जे आपलं जीवन घालवितात त्यांना निश्चितच उत्तम गती (सद्गती) मिळते.”
“आध्यात्मिक जीवनातही चढउतार असतात. अध्यात्माची वाट अवघड असली तरी साधकात उत्साह पाहिजे. मार्गक्रमण करण्यासाठी चांगला वेगही पाहिजे.”
जर साधकामध्ये पूर्ण समर्पण भाव असेल तरच त्याची आध्यात्मिक साधना पूर्णत्वाला जाते. तोच साधक लक्ष्यप्राप्ती करून घेऊन साधनापूर्तीचा आनन्द उपभोगतो.
If you wish to receive daily updates of “Jivanmantra” from Paramatraj Maharaj, you can join our WhatsApp group or simply share your mobile number. You will be blessed daily with Maharaj’s divine guidance for life and spirituality.
Lorem Ipsum
© 2025 Paramatmaraj Maharaj. All Rights Reserved